मुंबई – साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्यांच्या यादीत समाविष्ट असलेल्या सूर्याच्या प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांची नजर असते. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या सुर्याने ‘उडान’ आणि ‘जय भीम’ सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या शानदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
यापूर्वी, सूर्या पत्नी ज्योतिका आणि दोन्ही मुलांसह मुंबईत अनेकदा स्पॉट झाले होते. तर नुकतेच सूर्याने मुंबईत 70 कोटींचा महागडा अपार्टमेंट घेतला आहे. सूर्या मुंबईला का शिफ्ट झाला यामागचे कारणही मन जिंकणारे आहे.
वृत्तांवर विश्वास ठेवला तर, सुर्या आणि ज्योतिकाने त्यांच्या मुलांसाठी मुंबईला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. अशीही माहिती आहे की या जोडप्याने देव आणि दियाचे मुंबईतील एक शाळेत ऍडमिशन केली आहे. दुसरीकडे, दुसरी चांगली बातमी म्हणजे ज्योतिका लवकरच हिंदी वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने यासाठी मोठी रक्कम आकारली आहे.
सूर्या आणि ज्योतिका कायमस्वरूपी मुंबईत शिफ्ट झाले आहेत की नाही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ज्योतिका आणि सूर्याची पहिली भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. 1999 मध्ये पूवेल्लम केट्टुप्पर या चित्रपटाच्या सेटवर सुर्या आणि ज्योतिका यांची भेट झाली होती. ज्योतिका ही मुंबईतील पंजाबी कुटुंबातील आहे, तर सुर्या तमिळ आहे. तमिळ भाषेचे ज्ञान नसल्यामुळे ज्योतिकाला साऊथ फिल्म इंडस्ट्रीत पाय रोवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. ज्योतिकाच्या समर्पणाने सूर्य खूप प्रभावित झाला.