दक्षिण कोरियाकडून उत्तर कोरियाला 8 दशलक्ष डॉलरची मदत

सेऊल (दक्षिण कोरिया): दारिद्रयामुळे अडचणीत आलेल्या उत्तर कोरियाला मानवतावादी भूमिकेतून 8 दशलक्ष डॉलरची मदत देण्यास दक्षिण आफ्रिकेने मंजूरी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. उत्तर कोरियाच्या आण्विक केंद्रांबाबतच्या चर्चेमध्ये अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. मात्र तरिही मानवतेच्या दृष्टीकोनातून दक्षिण कोरियानेही मदत देऊ केली आहे.

अशाप्रकारे दक्षिण कोरियाकडून 2015 पासून प्रथमच उत्तर कोरियाला आर्थिक मदत दिली जात आहे. उत्तर कोरियामध्ये यंदा सर्वात कमी धान्य उत्पादन झाले आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. उत्तर कोरियाकडून दिली जाणारी ही मदत संयुक्‍त राष्ट्राच्या माध्यमतून दिली जाणार आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जेई यांनी उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये मध्यस्थी करण्याच्या हेतूने हनोई येथे आयोजित केलेली शिखर परिषद अपयशी ठरल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.