South Korea fires – दक्षिण कोरियाच्या दक्षिणेकडील भागात भडकलेल्या भीषण वणव्यामुळे एन्दोंग शहरातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दक्षिणेकडील गेल्या आठवड्यापासून भागात लागलेल्या या वणव्यामुळे आतापर्यंत हजारो जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे आणि या आगीमुळे डझनभर इमारतींचे नुकसान देखील झाले आहे.
किमान ९ ठिकाणी लागली ही आग विझवण्यासाठी दक्षिण कोरियातल्या अग्निशामक दलाच्या शेकडो कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. वाऱ्यामुळे ही आग गेल्या पाच दिवसात तब्बल ३६ हजार ३०० एकरपर्यंत पसरली आहे.
या वणव्यामुळे अग्नेयेकडील अन्दोंग शहर आणि आजूबाजूच्या उइसोंग गावातल्या अधिकाऱ्यांनी काही गावांमधील रहिवाशांना तात्पुरत्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. स्थलांतरासाठी परिसरातल्या प्राथमिक शाळा आणि बंदिस्त व्यायामशाळा खुल्या करून देण्यात आल्या आहेत.
कोरिया वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वणव्यामुळे दिलेल्या इशाऱ्याची व्याप्ती देशपातळीपर्यंत वाढवली आहे. यामुळे स्थानिक सरकारकडून आपत्कालिन उपाययोजनांना प्राधान्य दिले जाते आहे. धोकादायक परिसरांमधील आणि उद्यानांमधील प्रवेश रोखण्यात आले आहेत. तसेच लष्करालाही युद्धसराव स्थगित करण्यास सांगितले गेले आहे.
उइसोंग शहर आणि शेजारच्या सांचेओंग आणि उल्सान शहरांजवळ लागलेली आग विझवण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मात्र कोरडे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही आग नव्या ठिकाणी पसरली आहे.
या आगीमध्ये अग्निशामक दलाचे ४ क्रमचारी आणि सरकारी कर्मचारी मरण पावले आहेत. तर अन्य ११ जण जखमी झाले आहेत. तर ५,४०० पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे. १५० इमारतींचे नुकसान झाले आहे.
१,३०० वर्षे जुने बौद्ध मंदिरही आगीत नष्ट
आगीत नष्ट झालेल्या इमारतींमध्ये १,३०० वर्षे जुन्या बौद्ध मंदिराचाही समावेश आहे. उसेओंग गावातले हे मंदिर दक्षिण कोरियातल्या अतिपुरातन मंदिरांपैकी एक होते, असे सांस्कृतिक वारसा अधिकाऱ्यांनी सांगितले.
मात्र या आगीत कोणीही जखमी झाले नाही. याशिवायनागरिकांनी आग लाकडी मंदिराच्या वास्तूपर्यंत पाचण्यापुर्वीच काही दगडी बौद्ध मुर्ती तेथून सुरक्षित ठिकाणी हलवल्या आहेत.