साऊथ इंडियन फूडवर कंगणाने मारला ताव

भूमिका मोठ्या ताकदीने निभावणाऱ्या अभिनेत्री कंगणा राणावत हिने येत्या काळातही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्याचा निर्धार केला आहे. आगामी ‘पंगा’ या चित्रपटासाठी ती करत असलेली तयारी पाहता याचा सहज अंदाज लावता येत आहे. कंगणाच्या याच मेहनतीसाठी तिला चित्रपटाच्या टीमकडूनही खास भेट देण्यात आली आहे. ही भेट आहे, अर्थातच पोटभर जेवणाची. तेसुद्धा दाक्षिणात्य खाण्याची.

सहसा चित्रपट आणि विविध भूमिकांसाठी मेहनतच घेणारी बी टाऊनची ही क्वीन तिच्या खाण्यापिण्याच्या सवयींचे आणि व्यायामाच्या वेळापत्रकाचे नियमित पालन करत असते. पण, त्यातही घरगुती पद्धतीचे जेवण समोर येताच तिलासुद्धा स्वत:वर ताबा ठेवता आलेला नाही. टीम कंगणा राणावत या अधिकृत अकाऊंटवरुन याविषयीचा एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये कंगणा कोणाचीही तमा न बाळगता अक्षरश: त्या जेवणावर ताव मारताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BySFw4AFYsv/?utm_source=ig_web_copy_link

कंगणाने बॉलीवूडमध्ये स्वतःचे स्थान आपल्या परिश्रमातून बनवले आहे, हे सगळ्यांन माहिती आहे. तिने आता आपल्या सिनेमांचा एक निकष निश्‍चित करून टाकला आहे. तिच्या सिनेमांमध्ये कोणीही हिरो मुख्य भूमिकेत असणार नाही. तिला जे सिनेमे करायचे आहेत, ते प्रामुख्याने महिला केंद्रीत विषयांवरचे आणि नायिकांना मध्यवर्ती भूमिका देणारेच असणार आहेत. तिच्या चार सिनेमांमध्ये कोणीही हिरो नाही. “मणिकर्णिका’ आणि “पंगा’ हे त्यापैकीच एक आहेत. “पंगा’नंतर जयललितांच्या बायोपिकसाठी कंगणाने तारखा दिल्या आहेत. “मणिकर्णिका’ नंतर आता कंगणाला ऍक्‍शन रोलच्या ऑफरही यायला लागल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.