जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेमध्ये 12 वर्षांवरील मुलांसाठी कोविड-19 विरोधात फायझरच्या लसीला मान्यता देण्यात आली आहे. फायझरच्या लसींबाबत मार्च महिन्यात सादर करण्यात आलेल्या सुरक्षितता आणि परिणामकारकतेच्या अद्ययावत माहितीचा विचार केल्यानंतर ही मान्यता देण्यात आली आहे, असे “साऊथ आफ्रिकन हेल्थ प्रॉडक्ट आथॉरिटी’ने म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील 60 कोटी लोकसंख्येला म्हणजे एकूण लोकसंख्येपैकी 12 टक्के लोकांनाच कोविड-19 विरोधी लस देण्यात आली आहे. मात्र आता व्यापक प्रमाणात लस उपलब्ध झाल्यामुळे लसीकरणाला वेग आला आहे.
मात्र अजूनही नागरिकांकडून स्वयंस्फूर्तपणे लस घेण्याचे प्रमाण कमी आहे. ही एक चिंतेची बाब असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. आता नागरिकांनी स्वतः लस घ्यायला प्राधान्य द्यावे, असे आवाहन सरकारच्यावतीने करण्यात आले आहे.