ओव्हल – विश्वचषक स्पर्धेतील सलामीच्या लढतीत यजमान इंग्लंडकडून करारी शिकस्त मिळाल्यानंतर दक्षिण आफ्रिका रविवारी होणा-या दुस-या लढतीत बांगलादेशविरुद्ध विजयी अभियानची सुरुवात करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. तर स्पर्धेत विजयी सलामी देण्यासाठी बांग्लादेशचे खेळाडू सज्ज आहेत.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा दक्षिण आफ्रिकेने जिंकला आहे. आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने प्रथम गोलंदाजी स्विकारत बांगलादेशला फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.
#FafDuPlessis has won the toss and South Africa will have a bowl!
Will we see some #ProteaFire or the #RiseOfTheTigers today?#SAvBAN LIVE 👇https://t.co/6wY1jYPAUQ pic.twitter.com/B4Dz0ZFf02
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 2, 2019
दरम्यान, सामना सुरू झाला असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा बांगलादेशच्या 14 षटकांत 2 बाद 85 धावा झाल्या आहेत. सलामीवीर फलंदाज तमीम इकबाल 16 तर सौम्य सरकार हा 42 धावा काढून बाद झाला आहे.
बांगलादेश संघ –
तमीम इक़बाल, सौम्य सरकार, शाकिब अल हसन, मुशफ़िकुर रहीम, मोहम्मद मिथुन, महमूदुल्लाह, मोसद्दक हुसैन, मोहम्मद सैफुद्दीन, मेहंदी हसन, मशरफे मोर्तज़ा, मुस्तफ़िज़ुर रहमान
दक्षिण अफ्रीका संघ –
क्विंटन डी कॉक, ऐडेन मारक्रम, फाफ डू प्लेसी, रैसी वैन डर डुसेन, डेविड मिलर, जेपी डुमिनी, एन्डिले फेहलुकवेओ, क्रिस मॉरिस, कगिसो रबाडा, लुंगी एनगिड़ी, इमरान ताहिर
Two changes for South Africa from the side that faced England – will it spark a change in fortunes?#ProteaFire #RiseOfTheTigers#SAvBAN LIVE 👇https://t.co/6wY1jYPAUQ pic.twitter.com/xc5PYaBcQw
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 2, 2019