कार्डिफ – विश्वचषक स्पर्धांमधील खराब कामगिरीमुळे ‘चोकर’ समजल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिकेला पराभवाची मालिका खंडित करण्याची संधी आज अफगाणिस्तानविरूध्द मिळणार आहे. पहिल्या विजयासाठी उत्सुक असलेला अफगाणिस्तानचा संघही चमत्कार होण्याच्या प्रतीक्षेत आहे.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल दक्षिण आफ्रिकेने जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिस याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे.
💥 TOSS: #FafduPlessis has opted to bowl in Cardiff.
This is the first time South Africa and Afghanistan will lock horns in ODI cricket!
FOLLOW #SAvAFG ▶️ https://t.co/1Pwa3jahvz#ProteaFire#AfghanAtalan pic.twitter.com/4xLxi0ozC1
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 15, 2019
दक्षिण आफ्रिका आणि आफगाणिस्तान यांच्यातील सामन्यास सुरूवात झाली असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा आफगाणिस्तानच्या 5.5 षटकांत बिनबाद 33 धावा झालेल्या आहेत. सलामीवीर हजरतुल्लाह नाबाद 16 तर नूर अली देखील नाबाद 16 धावांवर खेळत आहेत.