कॅनबरा : लिजेल ली हिच्या शानदार शतकी आणि सुन लुस, शबनिम ईस्माइल यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यात थायलंडचा ११३ धावांनी पराभव करत विजय नोंदविला. लिजेल ली सामन्याची मानकरी ठरली.
South Africa win by 113 runs!
It's the biggest win in Women's #T20WorldCup history 😮#SAvTHA pic.twitter.com/LSjMkgg2X4
— T20 World Cup (@T20WorldCup) February 28, 2020
दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लिजेल ली हिच्या १०१(६०), सुन लुसच्या नाबाद ६१(४१) आणि क्लो ट्रायाॅनच्या २४(११) धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ३ बाद १९५ धावा केल्या होत्या. थायलंडकडून चनिदा सूतीरौंग, सुलीपोर्ण लोमी आणि रत्नापोर्न पदुंगलर्ड यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
त्यानंतर विजयासाठी १९६ धावांचा पाठलाग करताना थायलंडचा डाव १९.१ षटकांत ८२ वर आटोपला. थायलंडकडून फलंदाजीत ओनिचा कमचोमफुने २६(२१), चनिदा सूतीरौंगने १३(१७) आणि नटाया बूचाथम हिने ८(३१) धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून शबनिम ईस्माइल आणि सुन लुस हिने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. नैडीन डी क्लर्क, डेन वैन नीकर्क आणि नोनकुललेको म्लाबा हिने प्रत्येकी १ विकेट घेत संघाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.