पोटचेफ्स्टरूम (द. आफ्रिका) – जेजे स्मट्सच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 विकेटनी पराभव करत विजय नोंदविला. जे.जे. स्मट्स सामनावीर ठरला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्याची एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकली. हेनरिक क्लासेन हा मालिकावीर ठरला.
?? seal the win & the series
Brilliant peformance with bat & ball from The Proteas to seal the series
Smuts’ 8️⃣4️⃣ensured the victory
This win means that ?? have now won their 12th ODI series whitewash
Fantastic stuff from QDK & boys ?#ProteaFire #SAvAUS pic.twitter.com/C7Mtt0EfDh
— Cricket South Africa (@OfficialCSA) March 7, 2020
दक्षिण आफ्रिकेने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना मार्नस लबुशेनच्या 108(108), डार्सी शाॅर्टच्या 36(44) आणि मिशेल मार्शच्या 32(41) आणि जाय रिचर्डसनच्या नाबाद 24(20) धावांच्या खेळीच्या जोरावर 50 षटकांत 7 बाद 254 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत जे. जे. स्मट्स आणि ऐनरिक नाॅर्टजे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने विजयासाठीचे 255 धावांचे आव्हान 45.3 षटकांत 4 बाद 258 धावा करत सहज पूर्ण केले. आफ्रिकेकडून फलंदाजीत जे.जे. स्मट्सने 84(98), हेनरिक क्लासेनने नाबाद 68(63), काइल वेरेयेने याने 50(50) आणि क्विंटन डि काॅकने 26(31) धावांची खेळी करत संघास विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत जोश हेझलवूडने सर्वाधिक 2 तर केन रिचर्डसन आणि एडम जम्पा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.