#CWC19 : आव्हान राखण्यासाठी आफ्रिकेविरूद्ध श्रीलंकेला विजय अनिवार्य

वेळ – दु. 3.00 वा.
स्थळ – रिव्हरसाईड मैदान, चेस्टरलेस्ट्रीट

चेस्टरलेस्ट्रीट – इंग्लंडचा धुव्वा उडविणाऱ्या श्रीलंकेला स्पर्धेतील उपांत्य फेरी गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणाऱ्या लढतीत विजय मिळविणे अनिबार्य आहे. आफ्रिकेने आतापर्यंत या स्पर्धेत सपशेल निराशा केली असून त्यांच्या बाद फेरीच्या आशा यापूर्वीच संपुष्टात आल्या आहेत.

श्रीलंकेने आतापर्यंत दोन सामने जिंकले आहेत. उर्वरित सर्व सामन्यांमध्ये त्यांनी जर विजय मिळविला तर त्यांना उपांत्य फेरीच्या आशा आहेत. आफ्रिकेचा संघ कमकुवत मानला जात असल्यामुळे त्यांचे आज पारडे जड आहे. प्रौढ गोलंदाज लसिथ मलिंगा याने इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात अचूक मारा केला होता.

प्रतिस्पर्धी फलंदाजांना यॉर्करद्वारा चकविण्याची शैली अतिशय प्रभावी ठरली आहे. आजही त्याच्यावर लंकेच्या आशा आहेत. त्याचप्रमाणे धनंजय डी सिल्व्हा, नुवान प्रदीप व अँजेलो मॅथ्यूज यांच्याकडूनही त्याला चांगली साथ मिळेल अशी अपेक्षा आहे. फलंदाजीत इंग्लंडविरुद्ध पहिल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यानंतर मॅथ्यूजने एकांडी शिलेदाराची भूमिका बजावली होती. कर्णधार दिमुथ करुणारत्ने, कुशल मेंडीस, जीवन मेंडिस, कुशल परेरा, थिसारा परेरा यांच्यावरही त्यांच्या फलंदाजीची भिस्त आहे.

उर्वरित शान राखण्यासाठीच आफ्रिकेला संघर्ष करावा लागणार आहे. अव्वल दर्जाचे क्षेत्ररक्षण ही त्यांची ख्याती असली तरी येथे त्यांच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणातील चुकांमुळेच पराभव पत्करला आहे असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. सर्वच आघाड्यांवर त्यांच्या कामगिरीत सुधारणा होण्याची आवश्‍यकता आहे.

प्रतिस्पर्धी संघ :

दक्षिण आफ्रिका – फाफ ड्यु प्लेसिस (कर्णधार), एडन मरक्रम, हशीम अमला, डेव्हिड मिलर, जेपी ड्युमिनी, अँडिले फेलुकवायो, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, ख्रिस मॉरिस, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), इम्रान ताहीर, ड्‌वेन प्रिटोरस, तबरेझ शम्सी, रसी व्हॅन डर दुसे, ब्युरन हेंड्रीक्‍स.

श्रीलंका – दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), धनंजय डी सिल्व्हा, नुवान प्रदीप, अविष्का फर्नांडो, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, कुशल मेंडिस, जीवन मेंडिस, कुशल परेरा, थिसारा परेरा, मिलिंदा सिरीवर्धने, लहिरु थिरिमाने, इसरु उडाना, जेफ्री व्हॅंडरसे.

Leave A Reply

Your email address will not be published.