ओव्हल – शाकिब अल हसन आणि मुशफिकुर रहीम यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेसमोर 331 धावांचे आव्हान ठेवले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता. आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने प्रथम गोलंदाजी स्विकारत बांगलादेशला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकांत 6 बाद 330 धावसंख्येपर्यत मजल मारली.
बांगलादेशकडून मुशफिकुर रहीमने सर्वाधिक 78 आणि शाकिब अल हसनने 75 धावा केल्या. याशिवाय महमूदुल्लाहने 46 तर सौम्य सरकार याने 42 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून फिरकीपटू इमरान ताहीरने 2 तर वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा आणि क्रिस माॅरिसने प्रत्येकी 2 गडी बाद केले.
They started strong, and kept going!
Shakib and Mushfiqur missed out on centuries, but positive batting through the order meant Bangladesh posted an entertaining 330/6 in their #CWC19 game against South Africa. #SAvBAN LIVE 👇 https://t.co/Do3FK7GBBt pic.twitter.com/VtfbxF8LGQ
— ICC (@ICC) June 2, 2019
दरम्यान, द. आफ्रिकेला गुरुवारी झालेल्या लढतीत इंग्लंडने 104 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या लढतीत द. आफ्रिकेने इंग्लंडला 8 बाद 311 धावांवर रोखले होते. परंतु जोफ्रा आर्चरच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचा डाव 207 धावांवरच गुंडाळला. आजच्या सामन्यातून द. आफ्रिकेला वापसी करण्याची संधी आहे तर दुसरीकडे या सामन्यातून बांगलादेश स्पर्धेचा विजयी शुभारंभ करणयाचा प्रयत्न करेल.