गुवाहटी – दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आफ्रिकन संघ एका बदलासह या सामन्यात उतरला आहे. गेल्या सामन्यात महागात पडलेल्या तबरेझ शम्सीच्या जागी लुंगी एनगिडीचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दोन्ही संघातील प्लेइंग 11
भारत : केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, दीपक चहर, अर्शदीप सिंग.
South Africa have won the toss and elect to bowl first in the 2nd T20I.
A look at #TeamIndia‘s Playing XI here 👇👇
Live – https://t.co/R73i6RryDA #INDvSA @mastercardindia pic.twitter.com/gnw3eUMWPD
— BCCI (@BCCI) October 2, 2022
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रिले रुसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी.
2ND T20I. South Africa XI: Qd Kock (wk), T Bavuma (c), R Rossouw, A Markram, D Miller, T Stubbs, W Parnell, K Rabada, K Maharaj, A Nortje, L Ngidi. https://t.co/R73i6R9pps #INDvSA @mastercardindia
— BCCI (@BCCI) October 2, 2022
दरम्यान, तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने आठ गडी राखून जिंकला. आता टीम इंडियाला दुसरा सामनाही जिंकून टी-20 मालिका जिंकायची आहे. भारताने आतापर्यंत घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका जिंकलेली नाही. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या भूमीवर पहिली टी-20 मालिका जिंकण्याची संधी आहे.