आयपीएलमधील “स्टेन’गन थंडावली

जोन्हासबर्ग – दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज गोलंदाज डेल स्टेन याने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यंदा होणाऱ्या आयपीएलच्या 14व्या सत्रात स्टेन खेळताना दिसणार नाही. 2020 मध्ये आरसीबीकडून खेळताना स्टेनची कामगिरी निराशजनक झाली होती. त्यामुळे त्याला टीकेचा सामनाही करावा लागला होता. 

नववर्षाच्या सुरुवातीलाच स्टेनने ट्‌विट करत याबाबत माहिती दिली. आपल्या ट्‌विटमध्ये स्टेन म्हणाला की, प्रत्येकाला सांगू इच्छितोय यंदाच्या वर्षी आरसीबी किंवा इतर कोणत्याही संघासाठी उपलब्ध असणार नाही. काही काळासाठी विश्रांती घेत आहे. निवृत्ती नाही. मला समजून घेतल्याबद्दल आरसीबीचा आभारी आहे. आयपीएल वगळता इतर लीगमध्ये खेळणार असल्याचेही स्टेन याने दुसऱ्या एका ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, 37 वर्षीय वेगवान गोलंदाज स्टेनला यंदाच्या वर्षी आयपीएलमध्ये आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.