केपटाऊन – दक्षिण आफ्रिका व इंग्लंड यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका करोनाचा धोका वाढल्यामुळे रद्द करण्यात आली आहे.
आता नव्या वेळापत्रकानुसार पुढील काळात सर्व परिस्थितीचा आढाव घेऊन या मालिकेचे आयोजन केले जाणार आहे.
ही मालिका 4 डिसेंबरपासून सुरू होणार होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे हा सामना पुढे ढकलण्यात आला.
करोनाचा धोका वाढल्यामुळे दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी चर्चा करून आता ही मालिकाच पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.