दुबई – दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जुबेर हमजा डोपिंगमध्ये दोषी आढळल्यामुळे आयसीसीने त्याच्यावर 9 महिन्यांची बंदी घातली आहे. आयसीसीच्या डोपिंग विरोधी समितीने हमजा अनेकदा डोपिंगच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी दोषी ठरवत ही कारवाई केली आहे.
यंदा 17 जानेवारी रोजी त्याची डोपिंग चाचणी करण्यात आली होती, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला व त्यामुळेच आयसीसीने त्याला 9 महिन्यांसाठी निलंबित केले आहे. हमजावर 22 मार्च 2022 पासून बंदी घालण्यात आली असून 22 डिसेंबर 2022 रोजी बंदी संपेल.