नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली हे बीजेपी मध्ये सामील होणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरत आहे. सध्या अशी चर्चा होत आहे की, भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली हे 7 मार्चला बीजेपी मध्ये दाखल होऊ शकतात. परंतु आता या चर्चेवर बीजेपीने प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, बीजेपीचे पश्चिम बंगाल प्रमुख दिलीप घोष यांना जेव्हा याबाबत विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी सांगितले की, याबद्दल कोणतीही चर्चा सभेत झालेली नाही आणि त्याबद्दल मला काही माहिती नाही.
I have no idea about it, nor has there been any discussion in the meeting: BJP West Bengal chief Dilip Ghosh when asked whether former cricketer Sourav Ganguly will be joining BJP during PM Modi’s March 7 rally at Brigade Ground in West Bengal (02-03-2021) pic.twitter.com/meZGd9CImK
— ANI (@ANI) March 3, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 मार्चला पश्चिम बंगाल येथे ब्रिगेड ग्राउंडवर होणार्या रॅलीसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे यावरुन असे अंदाज बांधले जात आहेत की, या रॅलीत सौरव गांगुली भाग घेवू शकतात आणि या दरम्यान ते बीजेपी मध्ये सहभागी होऊ शकतात. परंतु यावर सौरव गांगुली यांच्याकडून आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.