आयपीएल २०२३ या हंगामासाठी सर्वच फ्रँचायझींनी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या मिनी लिलावात खेळाडूंना मोठ्या बोली लागल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गांगुली आता इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत मोठ्या भूमिकेत दिसणार आहे. कारण गांगुलीला दिल्ली कॅपिटल्स क्रिकेटचे नवे संचालक या पदाची जबादारी देण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांना गांगुलीला पुन्हा एकदा महत्वाच्या आणि मोठ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
#INDvsSLT20 | टीम इंडियाच्या ‘या’ दोन युवा खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये पदार्पण
गांगुली बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी तो सल्लागार म्हणून आयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीचा भाग होता. २०२२ वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर आता तो पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्ससोबत काम करताना दिसणार आहे.
आयपीएलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की,”गांगुलीने दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीसोबत काम केले आहे. तसेच त्याचे संघमालकांशी चांगले संबंध आहेत. जर त्याने आयपीएलमध्ये काम केले असते तर ते नेहमीच दिल्ली कॅपिटल्समध्ये असते. जर त्याने आयपीएलमध्ये काम केले असते तर तो कायम याच फ्रँचायझीसोबत राहिला असता.”
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा अपघात झाल्याने दिल्ली कॅपिटल्सला नव्या कर्णधाराची आवश्यता आहे. पंतची दुखापत पाहता तो संपूर्ण आयपीएल हंगामातून दूर राहू शकतो. त्यामुळे दिल्ली डेव्हिड वॉर्नरकडे कर्णधारपदाची धुरा देण्याच्या तयारीत असेल. मनीष पांडे यालादेखील कर्णधारपदासाठी दावेदार समजले जात आहे.
दिल्ली कॅपटिल्स – रिषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एनरिच नॉर्खिया, डेव्हिड वॉर्नर, ललित यादव, खलील अहमद, लुंगी एनगिडी, चेतन सकारिया, रोव्हमन पॉवेल, एम रहमान, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, सर्फराज खान, प्रविण दुबे, यश धुल, मिचेल मार्श, विकी ओत्स्वाल, रिपल पटेल, अमन खान, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनिष पांडे, रिली रोसोवू.