सौरव गांगुलीला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज; दिली ‘ही’ प्रतिक्रिया

कोलकाता –  भारतीय किक्रेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली यांना आज हॉस्पिटलधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सौरव गांगुली यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर म्हंटले कि, मी डॉक्टरांचे आणि उपचारासाठी हॉस्पिटलचे आभार मानतो. मी ठिक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सौरव गांगुली यांना हॉस्पिटलमधून सुट्टी दिल्यानंतर, नियमितपणे त्यांच्या घरी त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल, अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, सौरव गांगुली यांना ३ जानेवारी रोजी सकाळी जिममध्ये व्यायाम करताना छातीत दुखू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या हदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळले होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

गांगुली हे राजकारणात प्रवेश करून भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून त्यांना पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीत पुढे केले जाण्याची शक्‍यता वर्तवली जात असल्याने ते अचानक आजारी पडण्याच्या घटनेची बरीच चर्चा झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.