ऍक्टर आणि मॉडेल सोफी चौधरी सध्या आपली सुटी एन्जॉय करते आहे. उकाड्यापासून दूर जाण्यासाठी तिने समुद्रकिनाऱ्याकाठचे एक डेस्टिनेशन निवडले आहे. तिने समुद्रकिनाऱ्यावर बसलेले आपलेले अनेक फोटो सोशल मिडीयावर अपलोड करायला सुरुवात केली आहे. तिच्या या हॉट फोटोंची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हा समुद्रकिनारा मालदिवमधील आहे. तेथील निसर्गसौंदर्यामध्ये सोफी अगदी हरवून गेली आहे.
8 फेब्रुवारी 1982 ला जन्मलेल्या सोफीने 2005 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 2009 पर्यंत तिचे ऍक्टिंगचे करिअर ठिकठाक सुरू होते. त्यानंतर मात्र अनेक अडचणींमध्ये सोफी अडकली. सोफीने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक बोल्ड फोटो शूट केले होते. आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटवर ती नेहमीच आपले बोल्ड फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिच्या फॅन फॉलोअर्सची संख्याही अफाट आहे. इंग्लंडमध्येच लहानाची मोठी झालेली सोफी गायिकादेखील आहे. तिचे काही म्युझिक अल्बमदेखील प्रसिद्ध झाले आहेत. “झलक दिखला जा’ मध्ये देखील ती दिसली होती. सध्या बॉलिवूडमध्ये तिच्या नावावर कोणता प्रोजेक्ट आहे, याची काही माहिती तिने शेअर केलेली नाही.