मुंबई – कौटुंबिक चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेले सुरज बडजात्या यांनी मैत्री दिनाचे औचित्य साधत आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध केले आहे. बडजात्या यांनी हम आपके है कोण पासून ते प्रेमरतन धन पायो पर्यंत असे अनेक कौटुंबिक चित्रपट केले आहेत. राजश्री बॅनरच्या खाली निमिर्ती होणाऱ्या ‘उंचाई’ या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले.
उंचाईच्या फर्स्ट लूकमध्ये अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी हे हिमालयात ट्रेकिंग करताना दाखवले आहेत, ज्याच्या मागे माउंट एव्हरेस्टचे सुंदर सौंदर्य दिसते. 11 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज होणार्या या चित्रपटात अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, नीना गुप्ता आणि सारिका यांसारख्या दिग्गज कलाकारांचा अप्रतिम अभिनय प्रवास पाहायला मिळणार आहे, इतकेच नाही तर अभिनेत्री परिणीती चोप्रा देखील एका खास भूमिकेत असणार आहे. याशिवाय अभिनेता डॅनी डेन्झोंपा आणि नफिसा अली सोधी हे देखील या चित्रपटात विशेष भूमिकेत दिसणार आहेत.
This friendship day, we bring you the first look of Uunchai! A film about an ode to friendship, like never before!
Experience the magic of Uunchai at a theatre near you on 11.11.22 pic.twitter.com/Gh4dYubvrV— Rajshri (@rajshri) August 7, 2022
‘उंचाई’ हा राजश्री प्रॉडक्शनचा ६० वा चित्रपट आहे, तसेच दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा 7 वा दिग्दर्शकीय प्रोजेक्ट आहे,इंडस्ट्रीमध्ये कोणताही ट्रेंड असो राजश्रीने नेहमीच आपला कौटुंबिक प्रेक्षक जपला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना चित्रपटाच्या टीजरचे वेध लागले आहेत.