चीनमध्ये आता लवकरच 5 जी सेवा

बिजिंग: चीन सरकारची मालकी असलेल्या चार बडया टेलिकॉम कंपन्यांना 5जी सेवा सुरू करण्यासाठी गुरुवारी चीनच्या उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (एमआयआयटी) चीन टेलिकॉम, चीन मोबाइल, चीन युनिकॉम आणि चीन रेडिओ आणि टेलिव्हिजन या कंपन्यांना 5जीचे व्यापारी परवाने दिले आहेत.

5जी हे अत्यंत प्रगत दूरसंपर्क तंत्रज्ञान असुन सध्याच्या 4 जी एलटीई तंत्रज्ञानापेक्षा त्याचा डाऊनलोडचा वेग हा 10 ते 100 पट असल्याचे सांगितले जाते. चिनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 5जी जाळ्याच्या सर्वांगीण वापराने औद्योगिक उत्पादन, इंटरनेटने जोडलेल्या कार, आरोग्यसेवा, स्मार्ट शहरांचे व्यवस्थापन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या विकासाला मदत होणार आहे. चीनचे उद्योक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री मियाओ वी यांनी सांगितले की, 5जी तंत्रज्ञानामुळे वेगवान मोबाइल सेवा, सुरक्षित आणि व्यापक अशी प्रगत माहिती सुविधा निर्माण होईल.

तसेच त्यांनी पुढे सांगितले की, 5जी विकसित करण्यासाठी परदेशी कंपन्या पुढे आल्यास आम्ही त्यांचेही स्वागत करू. बहुआयामी आणि मुक्त व्यापार धोरणावर वाढत्या एकतर्फीपणाचा आणि संरक्षिततेचा हल्ला होत असताना ही मुक्तता टिकवून ठेवण्यासाठी चीनने योग्य पाऊल उचलले आहे, असा टोला त्यांना अमेरिकेचे नाव न घेता लगावला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.