देशातील परिस्थिती पाहून सोनू सूद झाला हताश म्हणाला,’कोणत्या देशात राहातोय आपण?’

 मुंबई –  करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात पूर्णपणे पोखरून काढले आहे. प्रत्येक दिवशी लाखोंच्या संख्येने विक्रमी करोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसात देशात साडेतीन हजारांच्या आसपास रुग्णांचा करोना, ऑक्सिजनअभावी बेड न मिळाल्याने मृत्यू होत आहे. भारतातील एकूण करोना मृतांची संख्या सव्वादोन लाखांच्या जवळ जाऊन पोहोचली आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे करोना मृत्यूंच्या यादीत जगात भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

तर दुसरीकडे देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे हाल होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र, दिल्लीमध्ये घडलेल्या ऑक्सिजनच्या दुर्घटना ताज्या असतानाच आता असाच तांडव पुन्हा एकदा देशासमोर आला आहे. ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास विलंब झाल्याने  देशातील अनेक राज्यात, जिल्ह्यात रुग्णांना प्राण गमवावे लागले. मरण पावलेल्या रुग्णांमध्ये अगणित करोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे. सद्य परिस्थिती बॉलीवूड अभिनेता सोनू सूदला प्रचंड वाईट वाटत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)


भारतातील कोरोनाच्या परिस्थितीवर नुकतीच वृत्त माध्यमांनी सोनूची मुलाखत घेतली यावर तो म्हणाला,’लोकांना मदत करण्यात सरकार असमर्थ आहे. मला सर्वात जास्त वाईट गरीब लोकांचे वाटे आहे.  त्यांच्याकडे पैसे नसल्याने ते त्यांच्या जवळच्या व्यक्तींवर उपचार करू शकत नाहीयते… आज माझे आई-वडील जिवंत असते आणि ते कोरोना व्हायरच्या विळख्यात अडकले असते ते मी स्वतःला असमर्थ समजलो असतो.’

तो पुढे म्हणाला,’ रोज मी लोकांच्या वेगवेगळ्या समस्या ऐकत आहे, त्या ऐकून आपण कोणत्या देशात राहात आहोत असा मला प्रश्न पडत आहे.’ असं म्हणत त्यांनी आपलं मत व्यक्त केल आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.