मुंबई – एक ट्विट करा आणि तुमची अडचण सोडवा, असंच काही सोनू सुदकडून होणाऱ्या मदत कार्याच्या बाबतीत घडत आहे. काही दिवसांपूर्वी सोनू सूद ने एका आजीला मदत केली. तसेच सिंधुदुर्गच्या स्वप्नालीलाही मदत केली होती. तसेच आज एका ऱ्हदयाला छिद्र असलेल्या चिमुकल्याची मदत करण्याची घोषणा सोनू सूदने केली आहे.
बिहार येथील धीरज कुमार याने सोनू सूदला टॅग करत एक ट्विट केले होते. त्यात त्याने लिहिले आहे की, एका लहान मुलाच्या ऱ्हदायाला छिद्र आहे. तो बिहारमधील आहे. आम्ही 40 जणांनी पैसे जमा करून 25 हजार रूपये दिले आहेत. या उपचारासाठी आणखी पैसे लागत आहेत. आता आम्हाला तुमच्याकडूनच आशा आहे. डाॅक्टरांनी बंगलुरू येथे ऑपरेशन करण्यास सांगितले आहे. याला तेथे अॅडमिट करण्यासाठी कृपया मदत करा, असं ट्विट धीरज कुमार याने केले.
धीरज कुमारच्या ट्विटला सोनू सूद ने “समझो हो गया” असे उत्तर दिले आहे.
समझो हो गया । https://t.co/M79DruToMr
— sonu sood (@SonuSood) October 26, 2020
दरम्यान, सोनू सूद ने अनेकांना मदत केली आहे. तो चित्रपटांमध्ये जरी व्हिलन चे काम करत असला तरी तो प्रत्यक्ष जीवनात रिअर हिरोचे काम करत आहे. सोनू सूद च्या या कार्याचे संपूर्ण देशभरात कौतुक करण्यात येते.