बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार बॉडी आणि अभिनयात माहीर असलेला सोनू सूद सध्याच्या कठीण काळातही लोकांच्या मनावर आधिराज्य करत आहे. सोनूने अलीकडे आपले जुहूमधील हॉटेल करोनाविरोधात दिवसरात्र काम करत असलेल्या डॉक्टर, परिचारिका आणि पॅरा मेडिकल स्टाफसाठी उघडले होते. त्यानंतर तो दररोज सुमारे 45,000 हून अधिक गरजू लोकांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करीत आहे.
आता त्यांनी रमजानच्या दृष्टीने असेच काही करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनू सूद आता रमजान महिन्यात भिवंडी परिसरात राहणाऱ्या 25 हजारांहून अधिक लोकांना फूड किट वाटप करणार आहे. ही मदत बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या दुर्गम शहरांमधून आलेल्या स्थलांतरित आणि गरजू लोकांना करण्यात येणार आहे.
सोनू सूदच्या या मदतीचे अनेकांनी कौतुक केले आहे. याबाबत सोनू सूद म्हणाला, ही वेळ खूप कठीण आहे आणि या काळात प्रत्येकाने एकमेकांना मदत करणे फार महत्त्वाचे आहे. या उपक्रमातून मी त्या सर्वांना मदत करू इच्छित आहे, जे भुकेलेले आहेत. विशेषत: रमजानमध्ये दिवसभर उपवास करून ते उपाशी राहू नये म्हणून आम्ही खास जेवणाचे किट उपलब्ध करून देत आहोत, असे त्याने सांगितले.