मुंबई : बॉलिवूडचा ‘मसीहा’ अर्थात अभिनेता सोनू सूद याने यशस्वीरित्या कोरोनाचा पराभव केला आहे. शुक्रवारी सोनूने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
सोनू एका आठवड्यातच कोरोना निगेटिव्ह झाला आहे. 17 एप्रिलला सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह झाला होता, त्यानंतर त्याची 23 एप्रिलला कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. कोरोना पॉझिटिव्ह होण्यापूर्वी सोनूने 10 दिवस आधी लस टोचून घेतली होती. कोरोना झाल्यानंतर अभिनेता बर्याच दिवसांपासून घरीच स्वत:ची काळजी घेत होता. तर, यादरम्यान देखील सोनू सोशल मीडियावर खूप अॅक्टिव होता, तिथे तो सतत लोकांना मदत करत होता.
आपण कोरोनाशी लढाई कशी लढावी, हे सोनूने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. सोनू म्हणतो की, आपण कोरोना पॉझिटिव्ह असाल तर औषधांसह आपल्याला स्वतःला सकारात्मक ठेवावे लागेल आणि अशा प्रकारे आपण लवकरच बरे होऊ शकता. तो म्हणाला होता की, ‘मी सर्वांना सांगू इच्छितो की जर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असाल तर, तुमची काळजी घ्या कारण कोणीही इतर तुमची काळजी घेणार नाही आणि ही कोरोनाची सर्वात भयानक गोष्ट आहे.’
सोनू पुढे म्हणाला, ‘कोरोनाशी लढा देण्यासाठी स्वत: सकारात्मक असले पाहिजे. आपल्याला नेहमीच सुपर चार्ज राहावे लागेल, कोणत्याही वेळी लो फील होऊ नये. फक्त यावर लक्ष केंद्रित करा की, आपल्याला कोरोनामधून रिकव्हर व्हायचे आहे.’