मुंबई – बॉलिवूड अभिनेता ‘सोनू सूद’ याने लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या कामगारांना आपापल्या घरी जाण्यासाठी मोलाची मदत केली. आतापर्यंत हजारो कामगारांसाठी सोनू सूद हा देवदूत बनून पुढे आला आहे. या कार्यामुळे सर्वांकडून त्याचे जोरदार कौतुक केले गेले.
दरम्यान, असा हा देवदूत पुन्हा एकदा गरजुंच्या मदतीसाठी उभा ठाकला आहे. सध्याच्या घडीला कोरोना काळात मृत पावलेल्या किंवा दुखापतग्रस्त झालेल्या मजुरांपैकी 400 जणांच्या कुटुंबाला सोनूनं आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे. एकदा प्रसिद्ध वृत्तसंस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे.
या कठीण काळात मृत्यूमुखी पडलेल्या आणि दुखापतग्रस्त झालेल्या स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबीयांना मी त्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी मदत करु इच्छितो. त्यांना आधार देणं ही माझी वैयक्तिक जबाबदारी आहे, असं मला वाटतं.” असं सोनूनं म्हंटल आहे.