नवी दिल्ली – अभिनेते सोनु सूद हे आम आदमी पक्षाच्या सरकारचे ब्रॅंड ऍम्बेसिडर बनले आहेत. त्यांना दिल्ली सरकारच्या देश का मेंटॉर या उपक्रमासाठी ही जबाबदारी देण्यात आली आहे. या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना करीअर विषयक मार्गदर्शन केले जाते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज ही घोषणा केली.
त्यांनी म्हटले आहे की, सरकारी शाळांमध्ये अनेक गरीब घरांतील मुले येतात. त्यांना करिअर विषयी मार्गदर्शन करणारे फारच थोडे लोक उपलब्ध आहेत. आम्ही शिक्षित व्यक्तींना त्यांचे मार्गदर्शक म्हणून पुढे येण्याचे आवाहन केले आहे. या मुलांचे आपण मेंटॉर व्हा असे आवाहन आम्ही केले आहे. या उपक्रमासाठी सोनू सूद हे ऍम्बेसिडर म्हणून काम करणार आहेत.
सोनू सूद यांनी केजरीवालांची भेट घेतली. तथापि ही भेट राजकीय विषयावरची नव्हती असे सूद आणि केजरीवाल या दोघांनीही स्पष्ट केले आहे. सोनू सूद हे संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी काम करणारे लोकप्रिय अभिनेते आहेत.