अभिनेता सोनू सूद हा सतत लोकांच्या मदतीसाठी धावून येत असतो. तसेच तो सोशल मीडियावरही गंमतीशीर पोस्ट करत गरजवंतांना मदतीचा हात देत असतो. असाच एक व्हिडिओ सोनू सूदने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
सोनूने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो बॅंड पथकामध्ये ढोल वाजविताना दिसत आहे. यात सोनू उत्कृष्टपणे ढोल वाजवित संगीत देताना दिसत आहे. या व्हिडिओला त्याने तितकेच गंमतीशीर कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिले की, “बॅंडवाला. लग्नसमारंभासाठी लगेच संपर्क करा.’
दरम्यान, करोनाच्या काळात सोनू सूदने अनेक परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्यासाठी मदत केली होती. तसेच त्यांच्या जेवणाचीही मोफत व्यवस्था केली होती. त्याच्या या कामाचे देशभरात कौतुक करण्यात आले होते.