Sonu Sood Mahakaleshwar Temple | अभिनयानंतर आता सोनू सुदने दिग्दर्शन क्षेत्रातही एन्ट्री घेतली आहे. त्याचा ‘फतेह’ हा पहिला दिग्दर्शित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी त्याने उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मंदिरात पूजा करतानाचे फोटो शेअर करत त्याने लिहिले की, “फतेहचा प्रवास महाकालपासून सुरू झाला आणि १० जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘फतेह’ चित्रपटाचे प्रमोशन सुरू करताना त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी पुन्हा येथे उभा आहे. जय महाकाल.” या फोटोंसह त्याने एक व्हिडिओही शेअर केला आहे.
या चित्रपटाविषयी बोलताना तो म्हणाल की, “‘फतेह’ हा केवळ एक ॲक्शन चित्रपट नाही. ही एक कथा आहे जी सायबर गुन्ह्याच्या वेगाने वाढणाऱ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकते. ज्यात एक थरारक कथा सांगितली जात आहे. हा चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. एक चित्रपट निर्माता म्हणून मी अशी कथा सादर करू इच्छितो जी जगाची कथा सांगते.” Sonu Sood Mahakaleshwar Temple |
View this post on Instagram
सोनू सूद दिग्दर्शित हा चित्रपट सायबर गुन्ह्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणारी कथा सांगणार आहे. यात जॅकलीन फर्नांडिस, विजय राज आणि नसीरुद्दीन शाह यांसारख्या अनेक स्टार्सचा समावेश आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. झी स्टुडिओ आणि शक्ती सागर प्रॉडक्शन प्रस्तुत ‘फतेह’ 10 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. Sonu Sood Mahakaleshwar Temple |
हेही वाचा:
अजय देवगणच्या ‘रेड 2’ चित्रपटाची प्रतिक्षा संपली; रिलीज डेट जाहीर