सोनू सूद यांनी 20 कोटींचा कर चुकवल्याचा आरोप

नवी दिल्ली – अभिनेता सोनु सूद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 20 कोटी रूपयांचा टॅक्‍स चुकवला असल्याचा दावा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने केला आहे. आयकर विभागाने त्यांच्याशी संबंधीत ठिकाणांवर छापे घालून जी कागदपत्रे जमवली आहेत त्यातून ही माहिती मिळाली आहे.

सूद यांनी विदेशातून देणग्या जमवताना परकीय चलन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्‍टचाही भंग केल्याचे उघडकीला आले आहे. या विषयीचे पुरावे त्यांच्या ठिकाणांवर छापेमारी केल्यानंतर आढळून आले आहेत.

सूद यांनी आपले बेकायदेशीर उत्त्पन्न अन्य खात्यांवर वळवल्याचेही स्पष्ट झाले आहे असे आयकर विभागाचे म्हणणे आहे. यासाठी सूद आणि त्यांच्याशी संबंधीत व्यक्तींनी बोगस हिशोब दाखल केले आहेत असेही आयकर विभागाचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.