Sonu Nigam | गायक सोनू निगमचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रेक्षकांच्या वर्तनामुळे भर कॉन्सर्टमध्ये सोनू निगम संतापल्याचे पाहायला मिळाले. ‘इकडे का उभा राहतो जा निवडणुकीत उभा राहा’ असे प्रेक्षकांना त्याने सुनावले. हा व्हिडिओ कोलकाता येथील एका कॉन्सर्टमधील आहे.
इंन्स्टाग्रामवर सोनू निगम व्हिडीओ एका चाहत्याने शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये सोनू निगम म्हणतो, ‘जर तुला उभं राहायचं असेल तर निवडणुकीत उभा राहा, कृपा करुन लवकर खाली बसा, माझा वेळ निघून जातोय, नाहीतर मला कमी गाणी घ्यावी लागतील, लवकर बसा नाहीतर बाहेर जा आणि जागा खाली करा,’ असं सोनू निगम म्हणाला. सध्या सोशल मीडियावर सोनू निगमचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
सोनू निगमचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही चाहते सोनूच्या रागाबद्दल समर्थन करत आहेत. एकाने लिहिले, ‘व्यवस्थापन खूपच खराब आहे, त्याला यावर नियंत्रण ठेवायला हवं.’ तर काहींनी ‘सोनू निगमने लोकांना शांततेने समजावून सांगितले पाहिजे होते,’ असे म्हंटले आहे. Sonu Nigam |
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सोनू निगमची प्रकृती कॉन्सर्टमध्येच बिघडली होती. पुण्यात कॉन्सर्टदरम्यान त्याला पाठदुखीचा त्रास सुरू झाला. मात्र तरीही त्याने प्रेक्षकांना निराश न करता गाणी सुरूच ठेवली. कॉन्सर्ट झाल्यानंतर सोनू निगमने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत प्रकृतीबद्दल माहिती दिली होती.
हेही वाचा:
Mumbai : ओशिवरातील फर्निचर मार्केटला भीषण आग; 20 ते 25 दुकानं जळून खाक