नवी दिल्ली : भारताच्या सोनिया लॅथर हिने बल्गेरियाच्या सोफियामध्ये सुरू असलेल्या स्ट्रांदझा स्मृती बाॅक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे.
सोनिया लॅथर हिने ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत आयर्लंडच्या मिचेल वाॅल्शचा ३-२ असा पराभव करत विजय मिळविला. या विजयाबरोबर तिचे स्पर्धेतील पदकही निश्चित झाले आहे.
7️⃣1️⃣st #Strandja International Boxing Tournament, Bulgaria🇧🇬, Updates!⏏️
@SoniaLatherBoxe confirmed medal for 🇮🇳 as she cruised into the SF after defeating 🇮🇪’s Walsh M. 3️⃣:2️⃣.
Congrats champ!👏
Let’s get the gold 🏅#PunchMeinHaiDum #boxing pic.twitter.com/dbik6UvgZQ— Boxing Federation (@BFI_official) January 24, 2020
दुसरीकडे याच स्पर्धेत ५१ किलो गटात गतविजेत्या निखत जरीनला मात्र पराभव पत्करावा लागला आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या क्रिस्टिना क्रूज हिने निखत झरीनचा ३-२ असा पराभव केला.