सोनियांकडे सुमारे 12 कोटींची, तर स्मृती यांच्याकडे पावणेपाच कोटींची संपत्ती

रायबरेली – यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सुमारे 12 कोटी रूपयांची संपत्ती आहे. तर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी या पावणेपाच कोटी रूपयांच्या संपत्तीच्या मालकीण आहेत.

सोनियांनी उमेदवारी अर्जासमवेत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा तपशील दिला आहे. त्यानुसार त्यांच्याकडे 11 कोटी 82 लाख रूपयांची संपत्ती आहे. त्यात 4 कोटी 29 लाख रूपयांच्या जंगम मालमत्तेचा समावेश आहे. सोनियांनी त्यांचे पुत्र आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना 5 लाख रूपये कर्जरूपाने दिले आहेत. त्यांच्या हाती 60 लाख रूपयांची रोकड आहे. मागील निवडणुकीवेळी सोनियांनी त्यांच्याकडे 9 कोटी 28 लाख रूपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते.
दरम्यान, स्मृती यांनी उमेदवारी अर्जाबरोबर जोडलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 4 कोटी 71 लाख रूपयांची संपत्ती आहे. त्यामध्ये 1 कोटी 75 लाख रूपयांच्या जंगम मालमत्तेचा आणि 2 कोटी 96 लाख रूपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. स्मृती यांचे पती झुबिन इराणी हे 1 कोटी 69 लाख रूपयांच्या जंगम तर 2 कोटी 97 लाख रूपयांच्या स्थावर मालमत्तेचे मालक आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.