नवी दिल्ली – काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर असून त्या बरे होत आहेत. सर गंगाराम हॉस्पिटलने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. बुधवारपासून त्यांना येथे दाखल करण्यात आले होते.
हॉस्पिटलच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष अजय स्वरूप यांनी सांगितले की, ‘सोनिया गांधी यांना व्हायरल रेस्पीरेटरी इन्फेक्शननंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, त्या आता स्थिर आहेत आणि वेगाने बऱ्या होत आहेत. डॉ स्वरूप यांनी सांगितले की, सोनिया यांना चेस्ट मेडिसिन विभागात दाखल करण्यात आले होते. त्यांना निरीक्षणावर ठेवण्यात आले आहे, आणि विषाणूजन्य श्वसन संसर्गावर उपचार सुरू आहे.