काँग्रेसच्या संसदीय नेतेपदी सोनिया गांधींची निवड

नवी दिल्ली – सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीतील संसद भवनामध्ये काँग्रेसच्या नवनिर्वाचित 52 खासदारांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये काँग्रेसच्या संसदीय नेतेपदी सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली असून काँग्रेसद्वारे लोकसभा निवडणुकांमध्ये देशातील 12 कोटी मतदारांनी काँग्रेसला मतदान करण्यात आल्याने त्यांचे आभार देखील मानण्यात आले. काँग्रेसद्वारा आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीमध्ये 17 जून पासून सुरू होणाऱ्या संसदीय सत्रातील मुद्यांवरही चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, “काँग्रेसपक्ष व काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते संविधानाच्या संरक्षणासाठी आणि भेदभावमुक्त भारतासाठी प्रयत्न करत आहे.” असं सांगितलं. तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे नाराज असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे देखील या बैठकीस उपस्थित राहिले होते. लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा मानहानीकारक पराभवामुळे राहुल गांधी यांनी आपल्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी समजूत काढल्यानंतर देखील राहुल गांधी हे आपल्या राजीनाम्याचा निर्णयावर अडून बसले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.