नवी दिल्ली – संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आज दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली.
कॉंग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुका झाल्यानंतर विरोधकांच्या एकिकरणाचे काम करावे असा सल्ला सोनिया गांधी यांनी यावेळी या नेत्यांना दिला. या दोन्ही नेत्यांनी कॉंग्रेसच्या नव्या अध्यक्षांना भेटावे आणि मग निर्णय घ्यावा असेही त्यांनी यावेळी सूचवले. भेटीनंतर लालू यादव यांनीच माध्यमांना ही माहिती दिली.
कॉंग्रेसशिवाय कोणतीही आघाडी शक्य नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधातील लढ्यात कॉंग्रेसच आघाडीवर आहे. कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर त्या आम्हाला पुन्हा भेटणार आहेत, असेही लालू यांनी सांगितले.