सोनिया गांधी उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज

लखनौ – कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी गुरूवारी (11 एप्रिल) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्या उत्तरप्रदेशच्या रायबरेली मतदारसंघातून पाचव्यांदा निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत. सोनिया 2004 पासून लोकसभेत रायबरेलीचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने दिनेशप्रताप सिंह यांना उमेदवारी दिली आहे. सिंह यांनी अलिकडेच कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. रायबरेली मतदारसंघात कॉंग्रेसने 1957 पासून तब्बल 19 वेळा विजय मिळवला. कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या त्या मतदारसंघात इतर पक्षांनी 3 वेळा विजयश्री मिळवली. भारतीय लोक दलाचे राज नारायण तिथून पहिल्यांदा 1977 मध्ये विजयी झाले. तर 1996 आणि 1998 मध्ये भाजपच्या अशोककुमार सिंह यांनी त्या मतदारसंघात बाजी मारली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.