नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज गुरुवारी सक्तवसुली संचालनालय (ईडी) चौकशी करणार आहे. त्या चौकशीच्या निषेधासाठी कॉंग्रेसकडून देशव्यापी निदर्शने केली जाणार आहेत.
नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने चौकशीसाठी सोनियांना समन्स बजावले आहे. त्या चौकशीवेळी होणारी निदर्शने आणि सध्या सुरू असणारी कावड यात्रा आदींमुळे दिल्लीतील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. ती ध्यानात घेऊन दिल्ली पोलिसांनी वाहतूक सुरळित ठेवण्याच्या उद्देशातून बुधवारपासूनच काही पाऊले उचलली आहेत.
National Herald case: Sonia Gandhi to appear before ED today, Cong to hold nationwide protest
Read @ANI Story | https://t.co/GiDB7l34Nh#NationalHeraldcase #SoniaGandhi #nationwideprotest #congressprotest pic.twitter.com/34TIMx3LNA
— ANI Digital (@ani_digital) July 21, 2022
तसेच, देशाच्या राजधानीतील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. सोनियांच्या आधी संबंधित प्रकरणात ईडीने त्यांचे पुत्र आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचीही चौकशी केली. त्यावेळीही कॉंग्रेसकडून देशभरात निदर्शने करण्यात आली होती.
दरम्यान, सोनिया गांधी यांच्या निर्मितीवर काँग्रेसने शक्तीप्रदर्शनाची योजना आखली आहे. त्यासाठी पक्षाने जोरदार तयारी केली आहे. राजधानी दिल्लीत काँग्रेसची आक्रमक वृत्ती संसदेपासून रस्त्यापर्यंत पाहायला मिळणार आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार सभागृहातून वॉकआउट करणार आहेत. यानंतर ते काँग्रेस कार्यालयात पोहोचतील.
“आज संपूर्ण देश मोदी सरकारची राजकीय सूडबुद्धी, हुकूमशाही आणि गुंडगिरी पाहत आहे. पण आम्ही ईडी-सीबीआयसारख्या कठपुतळ्यांना घाबरत नाही.” असं काँग्रेसने ट्वीटद्वारे म्हटलेलं आहे.
तर भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले,’आज सोनिया गांधी यांची ईडी चौकशी करणार आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष सत्याग्रह करणार आहे. हा सत्याग्रह नसून देशाचे कायदे आणि देशाच्या संस्थांविरुद्धची निंदा आहे.’ असं म्हणत रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर टीका केली आहे.