नवी दिल्ली : देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
Delhi: Congress Interim President Sonia Gandhi, Former Prime Minister Manmohan Singh and Former President Pranab Mukherjee pay floral tribute to Former Prime Minister Indira Gandhi on her birth anniversary. pic.twitter.com/AUuiYH12Dj
— ANI (@ANI) November 19, 2019
तसेच कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.
Tributes to our former PM Smt. Indira Gandhi Ji on her birth anniversary.
— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. तर त्यांच्या समाधीस्थळाला भेट देवून सोनिया गांधी, राहुल गांधी तसेच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीदेखील इंदिराजींना आदरांजली वाहिली.
सशक्त, समर्थ नेतृत्व और अद्भुत प्रबंधन क्षमता की धनी, भारत को एक सशक्त देश के रूप में, स्थापित करने में अहम भूमिका रखने वाली लौह-महिला और मेरी प्यारी दादी स्व० श्रीमती इंदिरा गांधी जी की जयंती पर शत् शत् नमन।#IndiraGandhi pic.twitter.com/7ezAIsSQ9N
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 19, 2019
दरम्यान, इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमीत्त देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इंदिरा गांधी यांना आयर्न लेडी म्हणून ओळखले जात होते. आणिबाणी आणि ऑपरेशन ब्ल्यु स्टार सारखे धाडसी निर्णय त्यांच्याच काळात घेण्यात आले त्यामुळे त्यांना बऱ्याच चांगल्या-वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. त्यांच्या याच आठवणींना आज देशभरात उजाळा देण्यात येत आहे.