नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी यांनी शनिवारी विविध मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला. सोनिया गांधीं यांनी मध्य दिल्लीतील निर्माण भवनात त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. यापूर्वी पोटाच्या संसर्गामुळे सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, चार दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाआहे.
कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मध्य दिल्लीतील सरदार पटेल विद्यालय मतदान करणार आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही निर्माण भवन मतदान केंद्रात आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनीही औरंगजेब लेनमधील एनपी उच्च माध्यमिक विद्यालयात मतदान केले.