सोनिया गांधी पॉलिटेक्‍निकच्या 153 विद्यार्थ्यांना नोकरी

संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांची माहिती
नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी

श्रीगोंदे – शैक्षणिक वर्ष 2018 – 19 मध्ये शिकत असलेल्या सोनिया गांधी पॉलिटेक्‍निकच्या विविध पदविका विद्या शाखामधील विद्यार्थ्यांना संस्थेच्या ट्रेनिंग ऍण्ड प्लेसमेंट विभागाच्या पुढाकाराने परिसर मुलाखतीमधुन विविध नामांकित कंपन्यांमध्ये तब्बल 153 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या असल्याची संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली आहे.

नागवडे म्हणाले, या शैक्षणिक वर्षामध्ये 15 हून अधिक कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने अभियांत्रिकी कोअर व आयटी क्षेत्रातील इनव्हारया आयटी सोल्युशन, यझाकी इंडिया, भारत फोर्ज, भारत गिअर, सुझलॉन, कमिन्स, फ्लॅश मशिन टेक्‍नॉलॉजी, एबिल, फ्लेक्‍सट्रॉनिक्‍स, सुनिती इंजिनिअरींग, फुकोकू, इपिटॉम, विषय कंपोनंट या कंपन्यांचा समावेश आहे.

या नामांकित कंपन्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर नोकरीसाठी निवड करुन महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले आहे. कंपन्यांनी 153 विद्यार्थ्यांची नोकऱ्यांसाठी निवड करुन हे सर्व विद्यार्थी सेवेत रुजू झाले आहेत. उर्वरीत विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षण घ्यायचे पसंत केले. यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींग 50, सिव्हिल इंजिनिअरींग 30, इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरींग 28, इलेक्‍ट्रॉनिक्‍स ऍन्ड टेलिक्‍म्युनिकेशन 32, व कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या 13 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.