राष्ट्रीय बाॅक्सिंग स्पर्धा : सोनिया चहल आणि मीना कुमारी उपांत्य फेरीत

कन्नूर (केरल) – मागील वर्षी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक मिळविणा-या सोनिया चहल (५७ किलो वजनी गट) आणि कोलोन जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या मीनाकुमारी देवीने (५४ किलो वजनी गट) शुक्रवारी महिला राष्ट्रीय बाॅक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश करत पदके निश्चित केली आहेत.

दरम्यान, याच स्पर्धेत २०१६ मध्ये सुवर्ण आणि २०१७ मध्ये कांस्यपदक जिंकणा-या सोनियाने ५७ किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत हिमाचल प्रदेशच्या विनाक्षीचा ३-२ ने तर अखिल भारतीय पोलिसाचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या मीनाकुमारीने उपांत्यपूर्व फेरीत ५४ किलो वजनीगटात झारखंडच्या सबीहा खनम हीचा ५-० ने एकतर्फी पराभव केला व उपांत्य फेरी गाठली.

तसेच याच स्पर्धेत पंजाबच्या बाॅक्सिंगपटूमध्ये परमिंदर कौर (८१ किलो), मीनाक्षी (४८ किलो) आणि मंदीप कौर संधु (५७ किले) यांनी सुध्दा उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.