कराड -पादचारी महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याच्या दोन सोनसाखळ्या दुचाकीवरील चोरट्याने चोरून पोबारा केला. ही घटना आज 21 रोजी वारुंजी फाट्यावर सायंकाळी सहा वाजता घडली. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
कार्वे येथील महिला आपल्या विवाहित मुलीसह काही दिवसांपूर्वी नातेवाईकांकडे पुण्याला लग्नसमारंभासाठी गेली होती. त्या दोघीही पुण्याहून परतताना माऊली हॉटेल समोर गाडीतून उतरल्या. तेथून त्या उपमार्गावरून उड्डाणपूलाकडे जाताना त्यांच्या पाठीमागून पल्सर गाडीवरून एकजण आला.
त्याने महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचा सोन्याचा नेकलेस व अर्ध्या तोळ्याची बोरमाळ हिसकावली. त्यानंतर त्या चोरट्याने उपमार्गावरून सातारा दिशेने धूम ठोकली. महिलेने आरडाओरडा केला. तेथे जमलेल्या आजूबाजूच्या लोकांना महिलेने घडलेला प्रकार सांगितला.