अभिनेत्री सोनम कपूर आज आपला 37 वा ‘बर्थ-डे’ साजरा करत आहे. सोनम लवकरच ‘गुड न्यूज’ देणार असल्याने हा बर्थ-डे तिच्यासाठी खूपच स्पेशल असणार आहे. सोनमने आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला एक व्हिडीओ पोस्ट केला असून यामध्ये तिने बर्थ-डे सेलिब्रेशनसाठी घरी परतले असल्याचं लिहलंय. व्हिडिओमध्ये सोनम एका कोचवर बसून आराम करताना तसेच पती आनंद सोबत फेरफटका मारताना दिसत आहे.
सोनमचे आई वडील अर्थात अनिल व सुनीता कपूर हे मुंबईत राहतात तर तिचा पती आनंद लंडनमध्ये स्थायिक आहे. अशात सोनमने पोस्टमध्ये केवळ घरी परतले असल्याचं लिहलं आहे. ती नेमकी मुंबईच्या घरी आहे की लंडनला गेली आहे याबाबत तिने काहीही सांगितलेलं नसल्याने यंदा तिच्या मुंबईतील घराबाहेर जाऊन शुभेच्छा देता येणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
सोनम कपूर मे 2018 मध्ये आनंद अहुजा यांच्यासोबाबत मोठ्या थाटामाटात विवाह बंधनात अडकली होती. यावर्षी मार्चमध्ये या दाम्पत्याने आपल्या घरी नवीन पाहुण्याचं आगमन होणार असल्याची ‘गुड न्यूज’ दिली. सोनमने आपल्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर मॅटर्निटी डायरी शेअर केली असून बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
अभिनेता अनिल कपूर यांची कन्या असलेल्या सोनमने रणबीर कपूर याच्यसोबत 2007 मध्ये सावरिया या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. रणबीरचा देखील हा पहिलाच चित्रपट होता. मात्र सावरिया तिकीटबारीवर फ्लॉप ठरला. पुढे इम्रान खान
याच्यासोबत आलेला आय हेट लव्ह स्टोरी हा चित्रपट सोनमचा पहिला हिट व्यावसायिक सिनेमा ठरला. सोनमने अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारल्या असून नीरजा, रांझना याला चित्रपटांमधील तिच्या भूमिकांचे विशेष कौतुक झाले. बॉलिवूडच्या या गुणी अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!