अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर बॉलीवूडमध्ये आपला जम बसवण्यासाठी धडपडतो आहे. त्याची बहीण सोनम कपूर तर राष्ट्रीय पुरस्कार घेऊन आता संसारामध्ये रमली देखील आहे.
हर्षवर्धन तर अजूनही एकटाच आहे. सध्या तो चांगला सिनेमा आणि गर्लफ्रेंड दोन्हीही शोधतो आहे. पण त्याच्या लव्ह लाईफवर सोनम आणि रिया या दोघी बहिणी लक्ष ठेवून असतात, असा त्याचा आक्षेप आहे.
तो कोणत्या महिलेबरोबर डेट करतो, यावर या दोघांचे बारीक लक्ष असते. त्याची पार्टनर कोण असावी, याबाबत या दोघींचेच मत अधिक महत्त्वाचे असते. कोणीही परफेक्ट नसते. ऍक्टरना त्यांच्या फिल्डमधील महिला नको असतात. अन्य क्षेत्रातील महिलांबद्दल त्यांना इंटरेस्ट असतो.
बॅंकिंग, मेडसीन आदी क्षेत्रातल्या महिला छान असतात असे या दोघींना वाटत असते, असे हर्षवर्धनने सांगितले. हर्षवर्धनने 2015 मध्ये “बॉम्बे वेलवेट’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. “भावेश जोशी सुपरहिरो’मध्येही तो होता.
पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रभाव पाडू शकला नाही. अलीकडेच “एके व्हर्सेस एके’ मध्येही तो होता. आता ऑलिम्पिक पदकविजेत्या अभिनव बिंद्राच्या बायोपिकमध्येही तो असणार आहे.