मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या गरोदरपणामुळे चांगलीच चर्चेत आहे. तिच्या खास फोटोशूटमुळे ती सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चेत राहिली होती. दरम्यान, आता सोशल मीडियावर तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची चर्चा रंगत आहे. लंडनमध्ये सोनमच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सोनमच्या डोहाळे जेवणामध्ये सगळं काही खास होते. सोनमची बहीण रियाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे काही फोटो देखील शेअर केले आहेत. सोनमच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम तिच्यासाठी अगदी आठवणीतला असावा म्हणून बहिण रियाने विशेष मेहनत घेतली होती. तसेच Leo Kalyan या गायकाने या कार्यक्रमामध्ये सोनमचे सुपरहिट गाणं ‘मसककली मसककली’ गायले. हे गाणं सोनमने या पार्टीदरम्यान खूप एण्जॉय केले. या गाण्यादरम्यानचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Leo Kalyan ने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. सोनमच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला गाणं गाण्याची संधी मिळाल्याने Leo Kalyan देखील खूश आहे.
सोनमने या कार्यक्रमासाठी गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला होता. तसेच तिचा लूक यावेळी अगदी उठून दिसत होता. ती संपूर्ण कार्यक्रम अगदी मनसोक्त एण्जॉय करताना दिसली. शिवाय कार्यक्रमामध्ये आलेल्या पाहुणे मंडळींना तिने खास भेटवस्तू देखील दिली.