बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री सोनम कपूर आणि दुलकर सलमान यांचा आगामी “झोया फॅक्टर’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत खूपच उत्सुकता असून काही दिवसांपूर्वीच आगळा-वेगळा विषय घेऊन “झोया फॅक्टर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर या चित्रपटातील “लकी चार्म’ हे गाणेदेखील प्रदर्शित करण्यात आले होते. या गाण्याला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता सलमान आणि सोनमची रोमॅन्टिक केमेस्ट्री असलेले गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.
या गाण्याची लिंक सोनमने सोशल मीडियावर शेअर केली असून त्याला “मान्सुनमध्ये प्रेमाचे रंग भरण्यासाठी झोया फॅक्टरचे गाणे’, असे कॅप्शन तिने दिले आहे. हे गाणे अरिजीत सिंग आणि अलेसा मेंडोसा यांनी गायले आहे. तर गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत.
दरम्यान, सोनम आणि दुलकर यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटात अंगद बेदी देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकरणार आहे. अनुजा चव्हाण यांच्या “झोया फॅक्टर’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये “झोया’ कशाप्रकारे सर्वांसाठी लकी चार्म बनते याचा प्रवास रेखाटण्यात आला आहे.