अभिनेत्री सोनम कपूर-आहूजा डेटवर जाऊ इच्छित आहे. तसेच मनसोक्तपणे तिला कार्ब्सचा आनंद घ्यायचा आहे. सोनमने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती पास्ता खाताना दिसत आहे. या मोनोक्रॉम फोटोत सोनम व्हाइट जॅकेटसह डार्क आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
हा फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “कधी-कधी स्वःताला डेटवर घेऊन जाणे आणि कार्ब्सचा आनंद घेणे आवश्यक आहे. हा स्वःताची काळजी घेण्यासाठीचा एक उत्तम पर्याय आहे.’ सध्या सोशल मीडियावर सोनम कपूरचे हे फोटो खूपच व्हायरल होत आहे.
यासोबत सोनमने आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात ती कॉकटेल पकडताना दिसत आहे. दरम्यान, सोनम सध्या स्कॉटलॅंडमधील ग्लासग्लो येथे “ब्लाइंड’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असून शोम माखीजा हे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाची कथा एका अंध पोलीस अधिका-याभोवती विणलेली आहे, जो एका सीरियल किलरच्या शोधात आहे.
“ब्लाइंड’मध्ये सोनम कपूरसह विनय पाठक, पूरब कोहली आणि लिलेट दुबे आदी कलाकार निर्णायक भूमिका साकारत आहे. या चित्रपटाबाबत सोनम कपूर खूपच उत्साहित आहे. तसेच चाहतेही या चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहेत.