“मलंग’ चित्रपटाची गुरुवारी स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. यावेळी चित्रपटसृष्टीतील स्टार कलाकारांची उपस्थिती होती. याप्रसंगी अभिनेत्री सोनम कपूर आपले वडील अनिल कपूर यांच्यासोबत स्क्रीनिंगला आली होती. बॉलीवूडमधील फॅशनिस्टा म्हणून प्रसिद्ध असलेली सोनमने ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केलेला होता, ज्याचा एक भाग शियर फॅब्रिक होता.
ब्लॅक ड्रेसमध्ये सोनम खूपच स्टनिंग वाटत होती, परंतु ट्रोलर्सला तिचा हा अंदाज आवडला नाही. सोनम कपूर ही आपल्या वडिलांसोबत खूपच बोल्ड ड्रेसमध्ये आल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी सोनम कपूरला खूपच ट्रोल केले.
एकाने युझर लिहिलेले की, वा!, आपल्या वडिलांसोबत अशा ड्रेसमध्ये उभी आहे? या लोकांना काही लाजलज्जा आहे की नाही.’ तर अन्य एका युझरने तिला वडिलांसमोर चांगले कपडे घालण्याचाही सल्ला दिला.
दरम्यान, यापूर्वीही सोनमला बोल्ड फॅशन चॉइसेजमुळे ट्रोल करण्यात आले होते.
View this post on Instagram
In all @bhaane for the @indiaartfair X BHAANE. MUA @kaushikanu ? @nayantaraparikh ? @demellierlondon
प्रोफेशनल फ्रंटबाबत बोलायचे झाल्यास सोनम कपूरचा गतवर्षी “एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ आणि “द जोया फॅक्टर’मध्ये झळकली होती. तसेच तिचा “मलंग’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात सोनमसोबत अनिल कपूरही मुख्य भूमिका साकारत आहे.