मुंबई- सोनम कपूर आणि तिचा नवरा आनंद आहुजा नुकतेच परदेशातून भारतात परत आले आहेत. दिल्लीत ती आपल्या सासुरवाडीमध्ये राहते आहे. आनंदने सोनमचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ती खिडकीतून आपल्या सासूशी बोलते आहे. यावेळी सोनमने लूज टॉप घातलेला आहे. तिचा हा पेहराव बघून तिच्याकडे गुड न्यूज असावी, असा अंदाज केला जातो आहे.
मात्र हे काही खरे नाही. गुडन्यूजच्या केवळ अफवा आहेत. सोनमच्या प्रेग्नन्सीच्या अनेक अफवा यापूर्वीदेखील पसरल्या आहेत. सोनम कपूर यापूर्वी “द झोया फॅक्टर’मध्ये दिसली होती. त्यात तिने दुलकर सलमानच्या बरोबर काम केले होते. आता “पिंकव्हिला’ हा तिचा आगामी प्रोजेक्ट असणार आहे. याशिवाय सुजॉय घोषच्या आगामी सिनेमातही तिला काम करायचे आहे. त्या सिनेमाची स्क्रिप्ट ती सध्या वाचते आहे.
जर करोनामुळे आयसोलेशनची स्थिती लवकर संपली नाही, तर फेसटाईम ऍपच्या माध्यमातून ही स्क्रिप्ट वाचणार आहे, असे तिने म्हटले आहे. हातात सिनेमा असताना इतक्यात आपल्याला बाळाचा विचार करणे शक्य नाही, असे सोनमने स्पष्ट केले आहे.